सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

उद्योगांची भरभराट

कोव मद्यार्क निर्मिती, खाद्यतेल, अधातू खजिन पदार्थ निर्मिती, औषध व रसायन उद्योग, बल्ब निर्मिती, कागद व त्यापासून वस्तू तयार करणारे कारखाने, विडी उद्योग, अँल्युमिनियम भांडी निर्मिती, चांदीच्या वस्तूंची निर्मिती, छत्री उत्पादन, मातीची भांडी व मंगलोरी कौले, हातमाग, सुतारकाम, लोहारकाम, पोहे व चुरमुरे निर्मिती, दोर वळणे, बांबू व वेतकाम उद्योगधंदे सुरू आहेत. कोल्हापूरच्या चपला प्रसिद्ध आहेत. शिवाय सिनेमा व्यवसाय हाही एक उल्लेखनीय उद्योगधंदा तेजीत आहे.

शाहू मिलची 1906 मध्ये स्थापना होऊन कारखान्याचा शुभारंभ झाला असला, तरी औद्योगिक प्रगतीस चालना मिळाली ती 1940 पासून. त्या वर्षी ऑईल इंजीन उत्पादनाचा कारखाना स्थापन करण्यात आला. कोल्हापूर व इचलकरंजीच्या कुशल कारखानदारांनी पुढील 45 वर्षामध्ये बरेच उद्योगधंदे उभे केले. अलीकडील काळामध्ये इचलकरंजी शहर कापड उद्योगधंद्याचे मोठे केंद्र बनल्याने महाराष्ट्राचे 'मँचेस्टर' म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने कापड उद्योगास अलीकडील काळात काही मर्यादा पडल्या असल्या, तरी या उद्योगधंद्यामध्ये मोठे भांडवल गुंतविलेले असल्यामुळे कामगारांना रोजगार उपलब्ध होईल.उद्योगास कोल्हापूरच्या औद्योगिकच नव्हे, तर कृषी अर्थव्यवस्थेमध्येही मोलाचे स्थान आहे. गूळ आणि साखर कारखाने अधिकाधिक प्रमाणात वाढू लागल्यानंतर ऊस पिकवण्यास उत्तेजन मिळाले. ऊस नगदी पीक असल्या कारणाने शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये आणि शेतीच्या उत्पादनक्षमतेमध्ये विलक्षण वाढ झालेली दिसून येते.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्योगधंद्यांना आवश्यक असलेली संरचना निश्चितपणे उपलब्ध आहे.त्यानंतर मात्र 1955 पर्यंत दुसरा एकही कारखाना जिल्ह्यात स्थापन झाला नाही. साखर उद्योगाची जिल्ह्यातील प्रगती साधारणपणे 1956 नंतरच झालेली दिसते. जिल्ह्यातील साखर उद्योगास प्रामुख्याने हातभार लावला तो लोहिया, रत्नाप्पा कुं भार, तात्यासाहेब कोरे, डी. सी. नरके, विक्रमसिंग घाटगे-पाटील यांनी. अलीकडील काळात सहकार क्षेत्रातील अनेक पुढार्‍यांनी या उद्योगाच्या विकासास हातभार लावला आहे. साखर उद्योग आणि गूळ निर्मितीमहाराष्ट्रातील औद्योगिकदृष्टय़ा प्रगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश होतो. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर व नाशिक या जिल्ह्यांच्या खालोखाल कोल्हापूरचा प्रगत जिल्हा म्हणून उल्लेख करता येईल.सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा, बांबू, साग, सावर, शिकेकाई, करंजी व हिरडा या वनोत्पादनाचा मुबलक पुरवठा उपलब्ध आहे.जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण जाणारा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, अनेक राज्य महामार्ग, मुंबई-कोल्हापूर लोहमार्ग आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. वित्तपुरवठा करणार्‍या सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर वित्तसंस्था या जिल्ह्यात असल्या कारणाने उद्योगधंद्यास भांडवल पुरवठा उपलब्ध होतो. कोल्हापूर जिल्ह्यात स्पिरिटल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा इतिहास लिहिताना उल्लेख करणे आवश्यक आहे की, राजर्षी शाहू महाराज यांनी 27 सप्टेंबर, 1906 रोजी शाहू मिल सूत गिरणीचा शिलान्यास करून शुभारंभ केला. कोल्हापूर संस्थानातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील ही पहिली सूत गिरणी. प्रारंभीच्या काळात संयुक्त भांडवलावर चालविण्यात आली. वर्षभराने गिरणीची आर्थिक दुरवस्था झाल्याने कोल्हापूर दरबारने ही गिरणी ताब्यात घेतली. प्रारंभीच्या काळात गिरणीचे व्यवस्थापन जेम्स फिन्ले आणि कंपनी यांच्याकडे होते. ही कं पनी कोल्हापूर प्रशासनाचे एजंट म्हणून 1935 पर्यंत व्यवस्थापन करत होती. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन मुंबई राज्यात 1949 मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर ही गिरणी मुंबई राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. प्रारंभापासून सूत गिरणी म्हणून कार्यान्वित असलेल्या शाहू मिलमध्ये 1928 मध्ये कापड विणकाम विभाग सुरू करून तिचे रूपांतर श्री शाहू स्पिनिंग अँण्ड विव्हिंग मिलमध्ये करण्यात आले. कापड उद्योगातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे यंत्रमाग उद्योग होय. या उद्योगातील पहिला यंत्रमाग कारखाना इचलकरंजी येथे 1928 मध्ये स्थापन करण्यात आला. कालांतराने या उद्योगधंद्यामध्ये बरीच सुधारणा होऊन दुसर्‍या महायुद्ध काळामध्ये त्यास चांगली अवस्था प्राप्त झाली. महायुद्ध काळामध्ये कापडास जोरदार मागणी असल्यामुळे यंत्रमागांची प्रगती झपाटय़ाने झाली. महायुद्धाच्या काळात मारवाडी कमिशन एजंट या उद्योगामध्ये शिरले आणि त्यांनी भांडवल पुरवठा करून या उद्योगधंद्यास ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत प्रगत असलेला अभियांत्रिकी उद्योगधंदा 1912 पासून अस्तित्वात आला. त्या वर्षी कोल्हापुरात पहिली अभियांत्रिकी कार्यशाळा स्थापन झाली. त्यानंतर कोल्हापूर व इचलकरंजी येथे अनेक अभियांत्रिकी कारखाने स्थापन करण्यात आले. कोल्हापूरची साखर आणि गूळ अखिल भारतात प्रसिद्ध आहे. गूळ उद्योगाचा इतिहास अधिकृतपणे ज्ञात नसला, तरी त्याला अदमासे दोनशे वर्षाची तरी परंपरा असावी. या जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना 1932 मध्ये स्थापन करण्यात आला. या कारखान्याचे जनक होते लोहिया शेट.