सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:लाच घ्यावी लागते. ही बाब खरी असली तरी ती घेताना व एकूणच परिसरात वावरताना सार्वजनिक आरोग्य बिघडणार नाही अशी काळजीही घ्यावी लागते. नागरिकांच्या अशा कृतीस प्रशासनाची योग्य साथ मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. नागरीकांनी केलेले पाण्याचे प्रदूषण, आवाजाचे-वायुचे प्रदूषण नागरिकांच्याच आरोग्यास बाधा पोहचविते. यासाठी प्रत्येक नागरीकांने सार्वजनिक ठिकाणी आपले वर्तन योग्य प्रकारे करणे महत्त्वाचे असते आणि त्याला पोषक अशा सुविधा पुरविण्याची व त्या बाबी नियंत्रित करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते.

को.म.न.पा. पर्यावरणीय अहवालांनुसार : ( इ. स. २००३-२००४)

होणारे आजार रुग्ण मृत्यूसंख्या दूषित पाण्यामुळे होणारे आजार ७२२० ३ हवेतून पसरणारे आजार ७७५४ २४३

वरील आकडेवारीत खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांची संख्या नाही.