सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


कोल्हापूर एकेकाळी तळयांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. चोवीसपेक्षा जास्त तलाव असणाऱ्या कोल्हापुरात आताअवघे दोन-तीनच नाव घेण्यासारखे तलाव शिल्लक आहेत आणि त्यांचीही अवस्था सहन करण्यापलिकडची आहे. हे तलाव हळूहळू मृतवत होत आहेत. निसर्गाविषयीची अनास्था, पर्यावरण विषयक जागृतीचा अभाव, वाढती लोकसंख्या, नियोजनाचा अभाव आणि वाढती व्यापारी वृत्ती यातून काही तलावांची मैदाने झाली, एकातलावाचे वॉटरपार्कमध्ये रुपांतर झाले, एका तळयावर भाजीमंडई सुरु झाली तर रंकाळा, कोटितीर्थ सारखे तलाव त्यामध्ये सांडपाणी मिसळत राहिल्याने जलपर्णी सारख्या वनस्पतींचे शिकार बनले. कळंबा तलाव,
राजाराम तलाव यांची वाटचाल कोणत्या दिशेने होणार? रंकाळा, कोटितीर्थ तलाव पुन्हा पर्यावरणीयदृष्ट्यासुदृढ बनू शकणार का? हे आपण, महापालिका प्रशासन आणि सरकार यांच्यावर अवलंबून आहे. निसर्गाचाठेवा म्हणून कोल्हापूर शहर आणि परिसरातील जलाशय जतन करायचे, या जलाशयाच्या परिसरातील प्राणी, पक्षी, कीटक, मासे आणि अन्य जलचर यांचे संरक्षण व संवर्धन हे आपण आपले कर्तव्य मानायले हवे.

तलावांबाबत तपशील

तलाव रंकाळा कळंबा कोटितीर्थ हनुमान राजाराम रमणमळा
बांधकाम वर्ष १८८७-९३ १८८१-८३ -- १९२८ --
धरणभिंत लांबी ३६२० मी. ११४६ मी. ६५० मी ३६६ मी. --
खोली ३० मी. १४ मी. ६० फूट ११ मी. ४ मी.
परीघ ६ कि.मी -- -- १.७५ कि.मी १६८५ मी.
क्षेत्र १०७ हे. ६३.१३ हे. ५७७४० मी२ २१.६ हे. १.८५ हे.
सभोवतालचे क्षेत्र   २.६० हे. ३.५ हे. ०.८७ कि.मी.
वर्ग
३ हे.
मस्त्यबीजासाठी १.१० हे. ६३.१३ हे. -- ६९.६ हे. २ हे.
मालकी पाटबंधारे विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को.म.न.पा. पाटबंधारे विभाग को.म.न.पा. को.म.न.पा.
ताबा को.म.न.पा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को.म.न.पा. को.म.न.पा. को.म.न.पा. ड्रीमलँड.क
प्राधिकरण

वरील सर्व तलावात सांडपाणी मिसळणे, कचरा टाकणे, कपडे धुणे, जनावरे व वाहने धुणे, बोटींग, मूर्ती व
निर्माल्य विसर्जन आदींमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
या तलावांपैकी रमणमळा तलाव २० वर्षांच्या कराराने जल, क्रीडा प्रकल्पासाठी तर रंकाळा तलाव १०
वर्षांसाठी व्यापारीकरणाच्या कराराने जाहीरात, बोटिंग, स्नॅक स्पॉट इ. साठी दिले आहेत. तलावांवर प्रदूषणाचा
ताण यांमुळे अधिक वाढत आहे.
या तलावांच्या परिसरात सुमारी २० जातींचे स्थलांतरीत आणि २१० अन्य जातींचे पक्षी आढळतात. शहर
परिसरातील पाणवठ्यावरील पक्षांची संख्या १५००० पेक्षा अधिक आहे. याखेरीज १६ जातींचे मासे, बेडूक,
कासव, सरडे, साप आणि ७७ प्रकारच्या पाणवनस्पती व इतर सूक्ष्म वनस्पती आढळतात.
क सध्या येथे तलाव अस्तीत्वात नसून येथे डि्न्मलँड प्रकल्प खासगीकरणातून उभा आहे.