सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

प्राचीन बौद्ध लेणी


सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा प्रसार झपाटय़ाने होत असताना बौद्ध प्रचारक भिक्षूक कोल्हापूर परिसरात होते. इ.स. पूर्व 400 ते इ.स. 300 पर्यंतच्या कालखंडात मूर्तीपूजा नसलेल्या हिनयान बौद्धपंथीयांच्या काळात कोल्हापूर परिसरात बौद्ध भिक्षूंसाठी ठिकठिकाणी लेणी खोदली गेली. हा सांस्कृतिक वारसा आजही दुर्लक्षितच आहे.
कि.मी. अंतरावर गगनगड या ऐतिहासिक किल्ल्याच्या अलीकडे 15 कि.मी. अंतरावर पळसंबा गावाजवळ हे नितांत रमणीय ठिकाण आहे. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट जंगलाच्या पाश्र्वभूमीवर बौद्ध गुंफा व एकपाषाणी तीन मंदिरे दुर्लक्षितपणे उभी आहेत. बौद्ध
गुंफेमध्ये आता शिवलिंगाची स्थापना झाली आहे. खळाळत्या ओढय़ाच्या पात्रात दोन हजाराहून अधिक वर्षे ही मंदिरे एकटेपणाचे दु:ख भोगत आहेत. पर्यटनवृध्दीसाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे ठरू शकते. जवळच छत्रपतींच्या अष्टप्रधानांपैकी पंत आमात्य बावडेकरांचा शिवकालीन वाडा हेही एक आकर्षण आहे.
पांडवदरा लेणी : पन्हाळागडजवळच्या मसाई पठारावर इंजोळे गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील गर्द झाडी असलेल्या डोंगरमाथ्यावरील कडय़ात खोदण्यात आलेली इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील लेणी पांडवलेणी म्हणून ओळखली जातात.