सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

फिरंगाई मंदिर
वरुणतीथाजवळील फिरंगाई देवीचे मंदिर असून हे बहुजन

समाजाचे दैवत मानले जाते. फिरंगाईस प्रत्यागिरादेवी म्हणूनही ओळखले जाते. भाविक लोक देवीला पीठ, मीठ, हळद आणि तेल अर्पण करतात. पूर्वीच्या काळी देवीसमोर रेडय़ाचा बळी दिला जात असे. आता ती प्रथा बंद झालेली असून आता बोकडाचा बळी देतात. मंदिराची बांधणी साधी असून ओबडधोबड दगडात केलेली शिल्परचना सामान्य आहे. मात्र हे देउळ महालक्ष्मी देवीच्या स्थापनेच्याही पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. मंदिर साधे असले तरी कोल्हापुरातील महा

लक्ष्मीच्या प्रभावापूर्वीच्या कोल्हापुरातील प्राचीन आणि बहुजन समाजाच्या द्राविड संस्कृतीच्या प्रभावाचे प्रतीक म्हणून अभ्यासकांच्या दृष्टीने या मंदिराचे स्थान अत्यंत महत्वाचे असे आहे. या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आहे.