सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर
काशी विश्वनाथ मंदिर- महालक्ष्मी मंदिरात घाटी दरवाजाच्या बाजूला काशी विश्वनाथाचे मंदिर आहे. तेथे कालभैरव, दंडपाणी, गंगा, धुंडिराज, गणेश ही काशीतील सर्व दैवते आहेत. तर मंदिरासमोर जाळीआड काशीकुंडात गंगा आहे. समोरच्या दीपमाळेत अगस्ती व लोपामुद्रा यांच्या मुर्ती आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असलेल्या उद्यानात 1960 पूर्वी मणिकर्णिका तीर्थ होते. दुर्दैवाने हे मणिकर्णिका तीर्थ सध्या मुजवले गेले आहे. काशीकुंडात गंगा, मणिकर्णिका तीर्थाचे अस्तित्व व काशीविश्वनाथाचे मंदिर यामुळे कोल्हापूरला काशीचा मान आहे. करवीर माहात्म्यानुसार देवी या क्षेत्री आल्यावर पाठोपाठ शिव आले. त्यामुळे इतर सर्व देवता या ठिकाणी येवून राहिल्या. |