दाजीपूर : एक रम्य पर्यटन क्षेत्र

दाजीपूर एक छोटसं, इवलसं नांव परंतु या दाजीपुरात रम्य, दाट कीर्द झाडी, वृक्ष-वल्ली, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी पाहिले की, या अरण्यात नित्य व्यवहारातील सर्व औपचारीक दैनंदिन व्यवहार विसरून निसर्गाच्या कुशीत लपलेला एका छोट्या मुलासारखी माया मिळते हे या गावाचे वैशिष्ट.

कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३ शे. लोकवस्तीचे हे स्थान कोल्हापूर सावंतवाडीच्या हमरस्त्यावर एकाकी झालेल हे गांव. गेल्या कांही दिवसापासून पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

गेल्या कित्येक वर्षात `गवारेडा' हा हुम दांडग्या परंतु वैशिष्ट्यपूर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्नत ख्याती आहे. या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो. त्याचबरोबर हरिण, सांबर, चितळ यांचे कळप ही दिसतील, कधी कधी लाल मातीत बिबळया वाघाचे चाललेले ठसे दिसतील.

जंगलात साळींदर, अस्वले, साप, नाग यांची ही रेलचेल सुरू असते. महाराष्ट्न् राज्याच्या जंगल खात्याने याकडे खास लक्ष देऊन या अभय अरण्याची चांगली जोपासना केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्न् पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरचे पर्यटन विकास केंद्र म्हणून लक्ष केंद्रित केले आहे. येथील युवक गृहाचे जंगल निवास म्हणून रूपांतर केले आहे. पर्यटकांसाठी ``तंबु निवास'' सुविधा केली आहे. भोजन, उपहार गृहे याचीही स्वतंत्र व्यवस्था आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या थेट गाड्या कोल्हापूर ते दाजीपूर येथे पर्यंत जातात. तर महाराष्ट्न् पर्यटन विकास महामंडळाने ही स्वतंत्र खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. राधानगरी जलाशयाचा नैसर्गिक उपयोग करून अद्यावत असे विश्रामगृह उभारणेचे काम सुरू केले आहे.

या परिसराजवळ सिंधुदुर्ग जिल्हा, गगनगिरी महाराज मठ याचा भाग असून ३७२ स्प्ेअर मिटरचा हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे.