सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पुनीत झालेला आंबा-विशाळगड परिसर
छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पुनीत झालेला आंबा-विशाळगड परिसर म्हणजे निसर्गाने मुक्त हातांनी केलेली सौंदर्याची उधळण होय. हिरवीगार वनराई व चारी दिशांच्या डोंगररांगांनी 'आंबा' गाव वेढलेले आहे.

शाहूवाडी तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोल्हापूर-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आंबा गाव आहे. येथे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये निसर्गाचे सौंदर्य फुलून येते. भर उन्हाळ्यातून जिकडे-तिकडे जेव्हा उष्णतेच्या लाटा वाहतात, त्यावेळी आंबा येथे मात्र थंडगार वार्‍याच्या झुळका येथे येणार्‍या पर्यटकांना सुखावतात. हिरवीगर्द झाडी, उंच डोंगरकडे, खोल खोल दर्‍या, त्यातच भर घालणारे जलाशय, धबधबे, निर्झर, मुक्त वनसंपदा विहंगम दर्शन यामुळे 'आंबा' हे ठिकाण 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जात आहे. आंबा घाटातून दृष्टिपथावरील सह्याद्रीचे विलोभनीय दर्शन, वैशिष्टय़पूर्ण साधनसामग्रीची विपुलता आदी नैसर्गिक प्रदस्त देणगी दुर्लक्षितपणामुळे मातीमोल होत आहे. जंगली जीवनाचे मानवी जीवनास असलेले औत्सुक्यच येथील पर्यटनास चालना देणार आहे. समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवरील या निसर्गरम्य थंड हवेच्या परिसरात पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास जंगलाचा र्‍हास या अडचणींना आळा बसेल त्याचबरोबर वनौषधी वनस्पती संवर्धन, जंगली पशु-पक्ष्यांच्या रानमेव्याचं संरक्षण, पर्यटकांचे मनपसंत नैसर्गिक पर्यटन या गोष्टी साध्य होतील. सद्य:स्थितीतील प्रचलित अनिर्बध पर्यटनास निर्बधित पर्यटन हा सुवर्ण पर्याय साकार होईल. वनराईतील प्राचीन शिवमंदिर पर्यटकांना आकर्षित करते. कडवी नदीच्या उगमावरील 'आंबा' मानोली लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे हरितमय होत आहे. पर्यटकांची बोटिंगची व पोहण्याची उणीव या धरणामुळे दूर झाली आहे. आंबा-विशागडमधील वीस किलोमीटरचा घाट म्हणजे सह्याद्रीच्या रांगडय़ा सौंदर्याची ठेव आहे. विसावा पॉईंट, कोकण दर्शन, विशाळगड दर्शन, घोडखिंड, आंबा

घाट, गायमुख, सनसेट पॉईंट, आंबा घाट, गायमुख, सनसेट पॉईंट, पर्यटन मार्गदर्शन केंद्र आदी ठिकाणी पर्यटकांना आकर्षित कोल्यावाचून राहत नाहीत.

विशाळगड मार्गावरील 'वाघझरा' म्हणजे बारमाही पाण्याचा निर्मळ साठा. वन्यजीवाचे दर्शन हमखास घडवणारे ठिकाण असल्यामुळे वन्य विभागाने या झर्‍याचे सुशोभीकरण करून पर्यटकांना बसण्यात कठडे उभारले आहेत. यामुळे पर्यटकांना वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. बागेवाडी यांनी माहितीचे दालन उभारले आहे. तर रमण कुलकर्णी यांचे फोटो संकलन आहे.

सासनकाडा चाळतवाडी येथे पावसाळ्यात अनेक धबधबे सह्याद्रीच्या दरीत कोसळतात. खरब्याच्या गावदारी धबधबा, हुंबवलीचा गंगोबा धबधबा, कोकणचा सडा, पंचक्रोशीतील श्री आदिष्टीदेवी, भैरी देवी, मारुती मंदिर, श्री गणेश मंदिर, आंबेश्वर मंदिर ही दैवत वनराईने वेढलेल्या घाटाला