सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


शहरात दररोज निर्माण होणारा घनकचरा : १५० मेट्रीक टन
शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण :

१) व्यापारी संकुल : १५ मे. टन
२) भाजी मार्केट : २५ मे. टन
३) कत्तल खाने : ०५ मे. टन
४) हॉटेल व रेस्टॉरंट : १० मे. टन
५) औद्योगिक क्षेत्र : १० मे. टन
६) रहिवास क्षेत्र : ८५ मे. टन







एकूण घनकचरा : १५० मे. टन

संदर्भ : को.म.न.पा. पर्यावरण
अहवाल २००३-२००४

वरीलपैकी किती कचरा कुजणारा व किती न कुजणारा आहे तसेच त्यामधील घटकांनुसारची आकडेवारी उपलब्ध नाही. किती टन कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि उर्वरीत कचरा कोठे जमिनीत गाडला जातो हे माहित नाही. हा अत्यंत गंभीर प्रश्न असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शिक ऑक्टोबर २००५ मधील नोंदीनुसार कचऱ्यामध्ये कागदाचे प्रमाण २.९१%, रबर, चामडे, सिंथेटिक पदार्थ ०.७८%, धातू ०.५६%, काच ०.३३%, कुजणारे घटक ४४.५७%, खरमाती ४३.५९% असे प्रमाण आहे. यावरून खरमातीसारखा घटक जरी कचऱ्यात येऊ दिला नाही तरी यंत्रणेवरील ४०% ताण कमी होऊ शकतो. याखेरीज आणखी गंभीर बाब म्हणजे कोल्हापुरातील लेड बॅटरीजची आकडेवारी :(उत्पादकाकडून वितरण)

तपशील २००२-०३ २००३-०४ २००४-०५ एप्रिल ०५ ते सप्टें. ०५
खरेदी केलेल्या लेड बॅटरीजची संख्या १३३२८ ३०९९४ २६९१९ ७८३४
परत केलेल्या लेड बॅटरीजची संख्या ७०२ १०७५ १५४५ ६३७

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील माहितीनुसार :(घाऊक खरेदी) संदर्भ : एन्व्हायर्नमेंट मॉनिटर २००५-०६

प्रदुषणास कारणीभुत ठरणारे घातक पदार्थ व ई-कचरा यांचे प्रक्रिया व्यवस्थापन व निर्गत हे मोठे आव्हान आहे.